-->
Area: 10480 sq km
Population: 30,03,741
Subdivision: 7
Telukas : 11
Villages: 1719

Tuesday, July 28, 2020

लॉकडाऊन

कवी अज्ञात

लॉकडाऊन होण्यासाठी    
    माझ्याकडे घर आहे,
दोन्ही वेळा भागवायला 
    अन्नही पोटभर आहे ! १

मनोरंजन खूप आहे,
    टीव्ही आणि इंटरनेट,
हवं ते मिळतंय सारं,
    एक फोन करता थेट ! २

दिवसभर व्हॉट्स अप चालू,
    भ्रमणध्वनी हाताशी,
कपाटात पुस्तकांच्या
    रचून ठेवलेल्या राशी ! ३

खूप जरी नसले तरी
    पैसे आहेत खात्यामध्ये,
गळ्यात गळा नसला तरी
    ओल आहे नात्यांमध्ये ! ४

वीज आहे, पाणी आहे,
    तसं काहीच कमी नाही,
उगीच कशाला कण्हायचं,
    कारण काढत काहीबाही ! ५

कित्येक जण असे आहेत,
    ज्यांच्याकडे नाही सारं,
कसं असतील जगत ते,
    एकांताचं झेलत वारं ! ६

त्यांच्याकडे नाही बरं कां
    वरीलपैकी एकही गोष्ट,
शारीरिक अन् मानसिक
    नशिबामध्ये केवळ कष्ट ! ७

तुलनेमध्ये त्यांच्या आपण
    सुखी आहोत कितीतरी,
देवाजीची आपल्यावरती
    कृपा आहे हीच खरी ! ८

कृतज्ञ मी देवा तुझा
    जे दिलंस त्याच्यासाठी,
ज्यांच्याकडे काहीच नाही
    ठेव थोडं त्यांच्यासाठी !
NEXT ARTICLE Next Post
PREVIOUS ARTICLE Previous Post
NEXT ARTICLE Next Post
PREVIOUS ARTICLE Previous Post